बिसलेरी इंटरनॅशनलने ठाणे महानगरपालिका (टीएमसी) शिक्षण विभागाच्या सहकार्याने ठाणे महानगरपालिकेच्या सर्व १२३ शाळांमध्ये ‘बॉटल्स फॉर चेंज’ उपक्रमाची सुरुवात केली. कचरा व्यवस्थापनाबाबत बिसलेरीचा हा एक प्रमुख उपक्रम असून, यामध्ये संस्था, गृहनिर्माण सोसायट्या आणि विविध समुदायांना सहभागी करून जबाबदार प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती केली जाते. या कार्यक्रमाला ठाण्याच्या महापौर सौ. शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, आयुक्त सौरभ राव (आय.ए.एस.) आणि शिक्षण विभागाच्या उपायुक्त डॉ. मिताली सांचेती यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या उपक्रमाचा एक महत्वाचा भाग म्हणून शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत सहभागी १२३ शाळांमधील सुमारे २०० शिक्षक, मुख्याध्यापक आणि सरकारी अधिकाऱ्यांना प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, कचऱ्याचे योग्य वर्गीकरण आणि पुनर्वापर प्रक्रियेबाबत प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी सहभागी शाळांमध्ये उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी विशेष अंमलबजावणी आराखडाही सादर करण्यात आला.
या उपक्रमाबाबत बोलताना बिसलेरी इंटरनॅशनल प्रा. लि.चे सीईओ डॉ. अँजेलो जॉर्ज म्हणाले, “पर्यावरणात मोठा बदल घडवून आणण्यासाठी रोजच्या छोट्या सवयी महत्त्वाच्या असतात आणि या सवयी लावण्यासाठी शाळांपेक्षा उत्तम ठिकाण दुसरे नाही. ‘बॉटल्स फॉर चेंज’ या उपक्रमाच्या माध्यमातून बिसलेरी २०१९ पासून शाळा, गृहनिर्माण सोसायट्या आणि समुदायांसोबत काम करत असून, प्लास्टिक कचऱ्याचे जबाबदारीने व्यवस्थापन करण्याबाबत जनजागृती करत आहे. ठाणे महापालिकेसोबतची आमची ही भागीदारी या चळवळीला शहरातील प्रत्येक महानगरपालिका शाळेपर्यंत पोहोचवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. शिक्षकांना सक्षम बनवून आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन आम्ही अशी पिढी घडवत आहोत जी कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, पुनर्वापर आणि ‘सर्क्युलर इकॉनॉमी’चे महत्व समजून घेईल. एकत्रित प्रयत्नांमधून आपण पर्यावरणाची जबाबदारी घेणारे नागरिक घडवू शकतो, जे भारताला स्वच्छ आणि अधिक शाश्वत भविष्याकडे नेण्यासाठी योगदान देतील. सौ. शर्मिला पिंपळोळकर, महापौर, ठाणेमहापालिका म्हणाल्या, “बिसलेरीसारख्या संस्थांसोबतची भागीदारी ही प्लास्टिक कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचीआहे. उद्योग क्षेत्राने जनजागृती आणि प्रशिक्षणाची जबाबदारी स्वीकारल्यास, उपलब्ध पायाभूत सुविधांचायोग्य वापर करण्यासाठी नागरिकांनाप्रोत्साहन मिळते. या उपक्रमाच्यामाध्यमातून ठाण्यातील विद्यार्थ्यांमध्ये हवामान कृतीची जाणीव निर्माण होईल आणि पर्यावरण संरक्षणासाठी त्यांचा सक्रिय सहभाग वाढेल, अशी आम्हाला आशा आहे.” सौरभ राव (भा.प्र.से.), आयुक्त, ठाणे महापालिका म्हणाले, “आजची मुले ही उद्याच्यापर्यावरणाची खरी संरक्षक आहेत आणि त्यांना त्यासाठी आजपासूनच सक्षम बनवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. ‘बॉटल्स फॉर चेंज’ हा उपक्रम ठाणे महानगरपालिकेच्या सर्व १०२ शाळांमध्येराबवून प्रत्येक विद्यार्थ्याला लहानपणापासूनच जबाबदार प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व समजावून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.


