राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून महापालिका कार्यक्षेत्रातील विविध प्रभागांमध्ये सर्वंकष स्वच्छता मोहिम राबविली जात आहे. या उपक्रमांतंर्गत महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या मार्गदर्शनाली आज प्रभाग क्र. 19 मधील रायलादेवी तलाव परिसरात सर्वंकष स्वच्छता मोहिम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आली. नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा मीनल संख्ये यांच्या उपस्थितीत स्वच्छतेची शपथ घेवून या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. यावेळी स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे, नम्रता भोसले-जाधव, राजेंद्र फाटक उपस्थितीत होते. या मोहिमेत रायलादेवी तलाव परिसरातील कचरा उचलून सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला. तसेच या ठिकाणच्या झाडांच्या फांद्याचे ट्रीमींग करण्यात आले तसेच येथील पालापाचोळा उचलण्यात आल्या. या ठिकाणच्या फरशांची घासून स्वच्छता करण्यात आली. तलावाच्या बाहेरील परिसरातील अनावश्यक साहित्य हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला. स्वच्छता मोहिमेसाठी घनकचरा व्यवस्थापन विभागातील 75 कामगार तैनात करण्यात आले होते. तसेच 2 शौचालय सफाई जेटिंग गाड्या, 2 आर्यन जेटिंग गाड्या, घंटागाडी, C&D कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्या, 1 जेसीबी आणि 1 डंपर यांचा वापर करण्यात आला.


