रताचा राष्ट्रध्वज म्हणजे देशाची अस्मिता, स्वातंत्र्य आणि एकतेचे प्रतीक असलेला तिरंगा, केशरी,पांढरा आणि हिरवा या तीन रंगांनी सजलेल्या या ध्वजाच्या मध्यभागी निळ्या रंगाचे अशोकचक्र विराजमान आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील विविध प्रयत्न आणि ध्वजाच्या विकासाच्या प्रक्रियेनंतर २२ जुलै १९४७ रोजी संविधान सभेने सध्याच्या स्वरूपातील राष्ट्रध्वजाला मान्यता दिली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १५ ऑगस्ट १९४७ पासून तिरंगा स्वतंत्र भारताच्या राष्ट्रध्वजाची ओळख बनला, १५ ऑगस्ट १९४७ रोजी तो भारतीय अधिराज्याचा अधिकृत ध्वज बनला. भारताच्या ध्वजात तिरंगा, म्हणजेच केशरी, पांढरा आणि भारतीय हिरवा रंग असून, त्याच्या मध्यभागी गडद निळ्या रंगाचे अशोकचक्र आहे. १५ ऑगस्ट, १९४७ या दिवशी, अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या सहकार्याने ब्रिटिश साम्राज्याकडून सत्ता भारताकडे सुपूर्द करण्यात आली, ज्यांच्या प्रयत्नांमुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले. राष्ट्रध्वज अभिमानाने फडकतो आहे. आपण देशातील सारे नागरिक त्याचे रक्षण करते आहोत. प्रत्येक नागरिकाला या राष्ट्रध्वजाचा अभिमान आहे.
आपण विविध धर्म, भाषा, संस्कृती आणि परंपरा जपणारे नागरिक एकाच भारतभूमीत एकतेने राहतो. आपल्या संविधानाने आपल्याला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही अमूल्य मूल्ये दिली आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून समानतेवर आधारित लोकशाही भारताची भक्कम पायाभरणी केली.
“विविधतेत एकता ” हीच आपल्या देशाची खरी ओळख आहे. सर्वधर्मसमभाव, परस्पर सन्मान आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना मनात जपत आपण देशाच्या प्रगतीसाठी योगदान देऊया, राष्ट्रध्वज हा केवळ तीन रंगांचा ध्वज नाही; तो आपल्या देशाची एकता, स्वाभिमान, त्याग, शांतता आणि समृद्धीचे प्रतीक आहे. चला, सर्व भेद विसरून एक भारतीय म्हणून राष्ट्रध्वजाला अभिमानाने सलामी देऊया आणि संविधानिक मूल्यांचे जतन करण्याचा संकल्प करूया.
पूर्वी झेंडा फक्त सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ठेवता येत होता. नवीन नियमांनुसार आता तो दिवस आणि रात्रभर (२४ तास) डौलाने फडकू शकतो, जर स्तंभावर पुरेसा प्रकाश असेल.
तिरंग्याच्या सन्मानासाठी ध्वजसंहितेचे पालन गरजेचे आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी राष्ट्रध्वज फडकावून देशभक्तीचा जागर करण्यात येणार आहे. या उत्सवी वातावरणात तिरंग्याची प्रतिष्ठा आणि पवित्रता अबाधित ठेवणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे.
राष्ट्रीय ध्वज फडकविताना भारतीय ध्वजसंहितेत नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. ध्वजाची योग्य हाताळणी, त्याची स्थिती, फडकविण्याची पद्धत तसेच वापरानंतर त्याची सन्मानपूर्वक व्यवस्था याबाबत घेणे गरजेचे आहे. कोणत्याही परिस्थितीत ध्वजाचा अवमान होणार नाही, याची दक्षता घ्यायची गरज आहे.
राष्ट्रीय ध्वज हा देशाची अस्मिता, स्वातंत्र्य, एकता आणि सार्वभौमत्वाचे प्रतीक आहे. त्यामुळे स्वातंत्र्यदिनाचा उत्साह साजरा करताना तिरंग्याचा सन्मान राखणे आणि ध्वजसंहितेतील नियमांचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. आपला राष्ट्रीय ध्वज म्हणजे भारताच्या गौरवशाली इतिहासाची ओळख आणि उज्ज्वल भविष्याच्या संकल्पाचे प्रतीक आहे! देशभक्तीची भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात अधिक दृढ व्हावी, राष्ट्रध्वजाबद्दलचा आदर, अभिमान आणि राष्ट्रप्रेमाची भावना जागृत व्हावी, या उद्देशाने दि. २ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत देशभरात ‘हर घर तिरंगा’ अभियान उत्साहात राबविण्यात येत आहे. या अभियानातून घराघरात तिरंगा फडकवत राष्ट्रभक्तीचा जागर आणि देशाच्या एकतेचा संदेश देण्यात येत आहे १५ ऑगस्ट २०२६ रोजी भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन देशभरात अभिमान आणि उत्साहाने साजरा केला जात आहे. स्वातंत्र्याच्या अमृत प्रवासातील हा ऐतिहासिक दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा आहे.
राष्ट्रध्वजाच्या साक्षीने देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीर स्वातंत्र्यसैनिकांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करूया, देशाची एकता, अखंडता आणि बंधुभाव जपत उज्ज्वल भारताच्या निर्मितीचा संकल्प करूया!
राष्ट्रीय ध्वज सदैव उंच राहो, राष्ट्रप्रेम प्रत्येकाच्या मनात आगृत राहो आणि आपल्या भारताची एकता, अखंडता व बंधुभाव अधिक बळकट होवोः चला, आपल्या घरावर तिरंगा अभिमानाने फडकवूया… आणि मनामनातही राष्ट्रप्रेम, एकता आणि बंधुभावाचा तिरंगा सदैव उंच ठेवूया।
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा। मी प्रथम भारतीय आणि अंतिमतः भारतीय !


