भिवंडी महानगर पालिकेत महापौरा नारायण चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण

भिवंडी महानगर पालिकेच्या मुख्यालय प्रांगणात ८९ वा स्वतंत्रदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महापौर नारायण चौधरी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले या वेळी आयुक्त अनमोल सागर, उपमहापौर तारीक मोमिन, स्थायी समिती सभापती ईशा इम्रान खान, प्रभाग समिती सभापती अँड. वैभव भोईर, हसनने फारूखी, अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त विक्रम दराडे, बाळकृष्ण क्षीरसागर, सपना वसावा व्यासपीठावर उपस्थित होते. तर ध्वजारोहण सोहळ्यास नगरसेवक पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी पर्यावरण संवर्धन, संरक्षण आणि व्यसन मुक्तीची शपथ घेत स्वतंत्रदिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. यावेळी अग्निशामक दलाचे जवान, महाराष्ट्र सुरक्षा मंडळ जवान व पोलिसांनी मान्यवरांना मानवंदना दिली. यावेळी महापौर नारायण चौधरी यांनी शहरवासीयांना स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा देत शहरात पालिका प्रशासनाच्या माध्यमातून विकास कामे सुरू असून शहरवासीयांना मूलभूत नागरी सुविधा मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधी सज्ज असल्याचा निर्वाळा दिला आहे.

Scroll to Top