नाव व चिन्ह उद्धव ठाकरे यांना मिळेल हा विश्वास आहे-सुभाष देसाई

सर्वसामान्य जनतेशी संवाद वाढवा, संबंध वाढवले तर त्यांच्या अडचणीच्या काळात आपली आठवण त्यांना नक्की होईल, शिवसैनिक तळागाळापर्यंत पोहचला पाहिजे मग किती ही पक्ष आले तरी शिवसेना अढळ राहील असा विश्वास शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी व्यक्त केला आहे. ते भिवंडी लोकसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या भगवा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र या अंतर्गत आयोजित मार्गदर्शन सभेत बोलत होते.

या प्रसंगी ठाणे व पालघर जिल्हा समन्वयक उपनेते विजय कदम, उपनेते विश्वास थळे, ज्योती ठाकरे, जिल्हा प्रमुख कुंदन पाटील, अँड. अल्पेश भोईर, जिल्हा सह संपर्क प्रमुख मनोज गगे,समन्वयक हनुमान पाटील, सह समन्वयक प्रवीण पाटील, महिला संघटिका पदाधिकारी रश्मी निमसे, कविता भगत, वैशाली मेस्त्री, तालुकाप्रमुख करसन ठाकरे, बाळा धानके, प्रदीप बोडके, गजेंद्र गुळवी, संतोष विशे, बाळा परब, निलेश पाटील, माजी शहर प्रमुख प्रसाद पाटील, युवा अधिकारी पंकज घरत यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसैनिक आपणाला मदत करणार हा विश्वास समाजमध्ये निर्माण करा. शिवसेनेचे पद हे फक्त मिरवण्यासाठी नाही तर सर्वसामान्यांच्या मदती साठी आहे हे विसरता कामा नये. बाळासाहेबांचे ब्रीद जोपासत काम केले की आपण नेहमीच लोकांच्या लक्षात राहतो. इतर पक्ष राजकीय स्वार्थाने काम करतात आपला शिवसैनिक त्यापेक्षा वेगळा आहे हे लोकांच्या मनात बिंबवले पाहिजे असा विश्वास शेवटी व्यक्त केला.

Scroll to Top