मेळाव्यात टोरंट पॉवरच्या अधिकाऱ्यांनी वीज दर (टॅरिफ), बिलिंग सायकल, मीटर रीडिंगची अचूकता तसेच घरगुती विद्युत उपकरणांचा सुरक्षित व कार्यक्षम वापर याबाबत ग्रामस्थांना सविस्तर मार्गदर्शन केले. वीज बिल, मीटर आणि वीजपुरवठ्याशी संबंधित नागरिकांच्या विविध प्रश्नांचे अधिकाऱ्यांनी जागेवरच निरसन केले. अधिकृत वीज जोडणीमुळे ग्रामस्थांना वीज वापराबाबत अधिक पारदर्शकता आणि सुविधा मिळणार असून, वीजसेवेशी संबंधित समस्या थेट संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत मांडण्यासाठी या संवाद मेळाव्यामुळे व्यासपीठ उपलब्ध झाले. या कार्यक्रमास स्थानिक नगरसेवक बाबाजी पाटील, नगरसेविका अर्चना पाटील, टोरंट पॉवरचे एजीएम प्रकाश चंदन, जनसंपर्क व्यवस्थापक शशिकांत, राहुल आमडे, नागेश यांच्यासह बहुसंख्य खर्डी ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांच्या शंकांचे थेट निरसन आणि नवीन वीज मीटर कार्यान्वित करण्याच्या उपक्रमामुळे हा ग्राहक संवाद मेळावा नागरिकांसाठी उपयुक्त ठरला.


