श्री सिद्धेश्वर शास्त्रोक्त वादन क्लासेस, दिवा यांच्या वतीने पखवाज अलंकार आनंद सावंत यांचा ‘गुरु अभिवादन सोहळा २०२६’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्यात पखवाज वादनासोबतच सामाजिक बांधिलकीचा संदेश ही देण्यात आला.
कार्यक्रमाला मुंबई पोलीस निरीक्षक सुरेश राणे, बुवा प्रमोद हर्याण, बुवा प्रमोद धूरी, बुवा ज्ञानेश्वर कदम, बुवा संतोष नांदोसकर, बुवा संतोष शितकर, बुवा स्वप्निल मेस्त्री, बुवा सुधाकर पातले, पखवाज वादक कृष्णा लाड, पखवाज वादक दत्ता गोसावी तसेच पत्रकार आरती मुळीक परब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कोकणकला प्रसारक संघ दिवा, सिंधुदुर्ग जिल्हा सेवाभावी संस्था दिवा, कोकण आधार प्रतिष्ठान दिवा, आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी संघ दिवा शहर आणि क्षत्रिय मराठा घाडीगावकर समाज दिवा या विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून गुरुवर्य आनंद सावंत यांचा सत्कार केला व त्यांना शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे आदिवासी पाड्यांतील तसेच अनाथ व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळावी, या उद्देशाने वही व पेन वाटपाची सामाजिक संकल्पना मांडण्यात आली. उपस्थित रसिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सकारात्मक प्रोत्साहन दिले. या सामाजिक उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमात पाच वर्षांच्या बाल शिष्यांपासून ते ज्येष्ठ शिष्यांपर्यंत सर्वांनी पखवाज वादनातून आपली कला सादर केली. विविध तालांमध्ये पखवाज सोलो वादन, शिष्यांचे सामूहिक सोलो वादन तसेच ढोलकी सोलो वादनाने रसिकांची दाद मिळवली. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. सोहळ्याच्या अखेरीस पखवाज अलंकार आनंद सावंत यांच्या सर्व शिष्यांनी गुरुपाद्य पूजन करून गुरुवर्याचे आशीर्वाद घेतले. गुरु-शिष्य परंपरेचा गौरव आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम घडवून आणणारा हा सोहळा उपस्थितांच्या स्मरणात राहिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित कदम यांनी केले.
संकलक चित्रपटाच्या प्रत्येक दृश्याला एकमेकांशी जोडत कथेला आकार देतो आणि हीच दृश्यांची साखळी जोडता-जोडता संपूर्ण चित्रपट दिग्दर्शित करण्याचं स्वप्न दिग्दर्शक निलेश नाईक यांनी पाहिलं. अनुभव, मेहनत आणि सर्जनशीलतेच्या जोरावर त्यांनी हे स्वप्न आता प्रत्यक्षात साकारलं आहे. एडिटिंगच्या बारकाव्यांपासून दिग्दर्शनाच्या व्यापक कॅनव्हासपर्यंतचा त्यांचा प्रवास ‘द्विधा’च्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे.
निर्णयांच्या उंबरठ्यावर उभं राहिल्यावर निर्माण होणारी मानसिक घालमेल आणि स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करण्याची धडपड अशा भावनिक पैलूंना स्पर्श करणारी ‘द्विधा ‘ची


