दिव्यात दशामाता विसर्जनाचा भव्य सोहळा

७० मूर्तीचे विधीवत विसर्जन

गुजराती विकास मंडळ, दिवाच्या अध्यक्षा तसेच मुंबई मेघवाळ पंचायत, दिवा विभाग क्रमांक ७० च्या महामंत्री मीनूबेन गोहिल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अशोक सोलंकी यांच्या प्रेरणेतून गणेशनगर तलाव, आगासन रोड, दिवा येथे दशामाता माताजींच्या विसर्जनाचा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला.

दशामाता माताजींचे दर्शन आणि विसर्जनासाठी दिव्यासह डोंबिवली परिसरातूनही मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. यावेळी अंदाजे ७० दशामाता माताजींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. भाविकांसाठी चहा, पाणी, गरबा तसेच बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. गुजराती विकास मंडळाच्या सर्व कमिटी सदस्यांनी रात्रभर उपस्थित राहून भाविकांची सेवा केली आणि संपूर्ण कार्यक्रमाची व्यवस्था सुरळीत ठेवली.

धीरज वालेरा आणि अमृत खिमोरिया यांनी संपूर्ण रात्र मूर्ती विसर्जनाच्या कार्यात तसेच भाविकांच्या सेवेत योगदान दिले. विशाल सोलंकी, ध्रुव पडाया, नयन परमार, प्रशांत वालेरा, मेहुल वालेरा, पिनाक वोरा, अजित सिंह, सुरेश मोहित यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी रात्रभर सेवा बजावली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दिनेश म्हात्रे, सचिन आणि शंभूराव पाटील यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.

Scroll to Top