राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी दिल्ली येथे निवड झाल्याबद्दल व्यायामपटूंचा सत्कार

गोवंडी येथे महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये साई फिटनेस जिमच्या नऊ व्यायामपटूंनी बाजी मारली. यामध्ये मास्टर वन किताब विजेता महेश पाटील, सब ज्युनिअर किताब विजेता दिव्यांशू पाटील, सुवर्णपदक सनी सपकाळ, प्रथमेश इंगळे, सर्वेश जामदार, रौप्य पदक हर्ष गायकवाड, कांस्य पदक स्वयम सिंग, यश वाडके, महिला गट रौप्य पदक कर्तव्या भवार यांनी पदके पटकावली.

या सर्व व्यायामपटूंची निवड ९, १० सप्टेंबर रोजी राष्ट्रीय स्तरावर दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी झाली आहे. संस्था स्थापन होऊन केवळ दीड वर्ष झालेले असताना कमी कालावधीत नऊ व्यायामपटूंची निवड होणे ही संस्थेसाठी आणि कल्याण शहरासाठी अभिमानाची बाब आहे.

या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात कल्याण शहरातील समाज सेवक नरेश पाटील, कोकण विभाग बांधकाम प्रमुख शिवसेना शिंदे गटाचे सचिन इंगळे, आगरी कोळी समाज उत्कर्ष मंडळ सदस्य योगेश भोईर, आगरी कोळी समाज उत्कर्ष मंडळ सदस्य सचिन भोईर, किरण म्हात्रे, केडीएमसी परिवहन मंडळ कर्मचारी सुरेश गावडे, राष्ट्रीय खेळाडू (किक बॉक्सिंग) दक्ष पाटील, मालिका-सिने कलाकार तृषांत जाधव यांच्या हस्ते सर्व व्यायामपटूंचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन राजेश देवरुखकर यांनी केले. तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिम मधील सर्व व्यायामापटूनी मेहनत घेतली.

Scroll to Top