दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा अभिनय कट्ट्यावर दिव्यांग कला केंद्रातील दिव्यांग मुलांनी पोलिस बांधवांसोबत रक्षाबंधन साजरे केले.
नौपाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांना दिव्यांग मुलांनी स्वतः केंद्रात बनविलेल्या राख्या बांधल्या. या अनोख्या दिव्यांग बंधनाच्या कार्यक्रमात क्राईम ब्रँचच्या पोलिस इन्स्पेक्टर सुप्रिया फडतरे, पी आस आय सोनाली काटकर, पोलिस हवालदार शेळके व इतर पोलिस सहकाऱ्यांनी सहभाग घेतला. पोलिस भावाच्या मनगटावर राखी बांधुन माझं संरक्षण होईल तसेच पोलिस बहिणीने बांधलेली राखी म्हणजे आपलं सुरक्षा कवच असेल हि भावना दिव्यांग कला केंद्रातील मुला मुलींमध्ये निर्माण होते. दिव्यांग कला केंद्रातील सर्व विशेष मुलांना प्रत्येक सण उत्सवाचा आनंद घेता यावा या उद्देशाने होळी, गणेश उत्सव, कृष्णजन्म अशा अनेक सण उत्सवाचे आयोजन दिव्यांग कला केंद्रात होते. त्यातीलच एक महत्वाचा सण म्हणजे विशेष मुलांचे, विशेष रक्षाबंधन म्हणजेच दिव्यांग बंधन साजरे करण्यात येते.


