गणेशोत्सवाच्या मंगलमय पर्वानिमित्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हस्ते गणेशोत्सव विशेष ‘आरती संग्रहा ‘चा प्रकाशन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
प्रभाग क्र. २१ मधील नागरिकांसाठी व गणेशभक्तांसाठी शिवसेना नौपाडा विभाग प्रमुख किरण विष्णु नाकती यांच्या वतीने त्यांच्या मातोश्री कै. लक्ष्मी विष्णु नाकती यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा आरती संग्रह प्रकाशित करण्यात आला असून, गणेशोत्सवानिमित्त नागरिकांना या आरती संग्रहाचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.
आपली संस्कृती, परंपरा आणि भक्तीचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, गणेशोत्सवातील आरतीच्या वेळी सर्व पारंपरिक आरत्या एकाच संग्रहात भाविकांना सहज उपलब्ध व्हाव्यात, या भावनेतून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या आरती संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यास ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के, महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक, महापौर सौ. शर्मिला पिंपळवळकर, शिवसेना सचिव राम रेपाळे, माजी परिवहन सभापती विलास जोशी, गटनेते पवन कदम, शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, लोकसभा सचिव बाळा गवस, ठाणे उपशहरप्रमुख राजेश तावडे, विभाग प्रमुख अमित जयस्वाल, उपविभाग प्रमुख दिनेश सकपाळ, शाखाप्रमुख दिनेश चोरगे, उपशाखाप्रमुख रमाकांत चौधरी, युवासेनेचे ऋषिकेश कदम, संजय पवार, जयेश वाकचौरे यांच्यासह नौपाडा विभागातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होते.
किरण नाकती यांच्या माध्यमातून ‘आरती संग्रहा’चे प्रकाशन



