कसारा पश्चिमेकडील प्रवाशांकरिता स्वयंचलित तिकीट विक्री यंत्र केले सुरू
येथील पश्चिम बाजूकडील प्रवाशांना तिकिटे काढण्यासाठी स्वयंचलीत तिकीट विक्री यंत्र किंवा तिकीट खिडकी अद्याप सुरू न झाल्याने अनेकदा त्रासाला सामोरे जावे लागत होते. या संदर्भात दै’ ठाणे वार्ता ‘ मध्ये दि २४ सप्टेंबर रोजी वृत्त प्रसिद्ध करून रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. स्थानिक प्रवाशांच्या या असुविधेबाबतच्या वृत्ताची दखल घेण्यात आली असून दि. ६ ऑक्टोबर पासून एफओबी वर पश्चिमेकडे स्वयंचलित तिकीट विक्री यंत्र सुरू केले असल्याची माहिती कसारा स्टेशन मॅनेजर रोहित उबाळे यांनी दिली असून या माध्यमातून पश्चिम बाजूकडील प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.



