आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल, अघई-मोहिली या संकुलातील विद्यार्थ्यांनी झालेल्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली असून त्यांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे.
जिल्हा क्रीडा कार्यालय, ठाणे अंतर्गत आयोजित तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा येथील आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात पार पडल्या असून या स्पर्धेत शहापूर तालुक्यातील जवळपास पाचशे विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये धावणे, उंच-लांब उडी, भाळाफेक, गोळा व थाळी फेक अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या झालेल्या मैदानी स्पर्धांमध्ये विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट (कोकमठाण) संचलित आत्मा मालिक संकुलातील इंटरनॅशनल स्कूल व इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज मधील एकूण 160 विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी 14,17 व 19 वयोगटातील वैयक्तिक व सांघिक विविध स्पर्धांमध्ये सहभाग होता. यामध्ये 112 विद्यार्थ्यांनी प्रथम, द्वितीय क्रमांक मिळवून यशस्वी कामगिरी केल्याने त्यांची जिल्हा स्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
यासाठी वसतिगृह व्यवस्थापक (क्रीडा प्रशिक्षक) संतोष मेढे, क्रीडा विभाग प्रमुख पुरुषोत्तम पानबुडे व सर्व क्रीडा शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले तर या मिळालेल्या यशाबद्दल परमपूज्य सदगुरु आत्मा मालिक माऊलींच्या कृपाशीर्वादाने व संत परिवाराच्या प्रेरणेने संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, विश्वस्त तथा शाखा कार्याध्यक्ष उमेश जाधव, उपाध्यक्ष प्रकाश भट, सचिव अनंत गायकवाड, स्थानिक शाखा सदस्य प्रवीण मोरे, विजय कपूर, शालेय व्यवस्थापक ब्रिज भारद्वाज, इंटरनॅशनल स्कूल प्राचार्य कैलास थोरात, इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज प्राचार्या पौर्णिमा उपासनी, इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड टेक्नॉलॉजी प्राचार्या आरती करांडे, व्यवस्थापक (सा.प्र.) उल्हास पाटील, शिक्षक-शिक्षिकेतर, कर्मचारी व पालक वर्ग यांनी यशस्वी खेळाडू व प्रशिक्षक यांचे अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
आत्मा मालिक संकुलातील विद्यार्थ्यांची मैदानी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी



