शहापूर तालुक्यातील कसारा येथे अनेक वर्षे वास्तव्य करून सध्या कल्याण रामबागेतील रहिवाशी असलेले म्युनिसिपल कामगार नेते बाबुराव जाधव यांना सपत्नीक दी बी चेंज फाऊंडेशन शिर्डीच्या वतीने राज्यस्तरीय महाराष्ट्र गुणगौरव पुरस्काराने नुकतेच सन्मानीत करण्यात आले आहे. बाबुराव जाधव हे बहूजन चळवळीचे नेते असून त्यांनी आजवर म्युनिसिपल कामगारांचे अनेक लढे यशस्वी केले आहेत. शिवाय ते बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकरांचे अतिशय निकटचे सहकारी असल्याचे म्हटले जाते. जाधव यांच्या पत्नीने आरोग्यसेवेत नोकरीला असतांना हजारो रुग्णांची शुश्रूषा केली आहे. यामुळे या उभयतांचा यथोचित सन्मान झाला.
कामगार नेते बाबुराव जाधव यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान



