कल्याण दरम्यान एसी लोकलच्या टपावर तरुणाचा थरारक प्रवास 

कल्याण दरम्यान एसी लोकलच्या टपावर तरुणाचा थरारक प्रवास कल्याण रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा अर्धा तास खोळंबा

कल्याण – विठ्ठलवाडी ते कल्याण दरम्यान दुपारी सुमारे २:०३ वाजता एसी लोकल ट्रेनच्या छतावर एक तरुण चढल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली.
विठ्ठलवाडी स्थानकावर पोलिसांनी संबंधित तरुणाला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला, तो व्यक्ती खाली उतरला काही वेळानंतर परत लोकल वर चढला अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. त्यामुळे ट्रेन पुढे कल्याण स्थानकाकडे रवाना झाली. कल्याण स्थानकावर ट्रेन पोहोचल्यानंतर २ ते ३ हमाल रेल्वे पोलीस आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करत सुमारे २:५० वाजता त्या तरुणाला खाली उतरवण्यात यश मिळवले. त्यानंतर त्याला तात्काळ रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या संपूर्ण प्रकारामुळे सुमारे अर्धा ते पाऊण तास प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top