ठाणे – सुप्रसिद्ध कथालेखिका पूनम कर्णिक यांना सर्वद फाउंडेशनतर्फे नुकतेच ‘सर्वद स्टार’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कथालेखिका, गायिका, निवेदिका म्हणून ठाणेकरांना सुपरिचित असलेल्या सौ. पूनम कर्णिक यांचा शारदा प्रकाशनाने प्रकाशित केलेला ‘नाजूक नाती’ या कथासंग्रहाचे वाचकांनी मनापासून स्वागत केले. या कथासंग्रहाचे प्रकाशन सुप्रसिद्ध सिने अभिनेते अनंत जोग यांच्या हस्ते झाले होते. पूनम कर्णिक यांनी आपल्या गायनातून आणि निवेदनातून रसिकांची मने जिंकली आहेत. त्यांच्या गौरवशाली कार्याचा आढावा घेणारी चित्रफित लक्षवेधी ठरली. सर्वद फाउंडेशन आयोजित सर्वद स्टार पुरस्कार समारंभ २०२६ हा कार्यक्रम नुकताच उत्साहपूर्ण
वातावरणात संपन्न झाला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सन्मानचिन्ह, सॅश व गौरवपत्र देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहन सालेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध सिने-नाट्य अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते अरुण नलावडे तसेच विद्यावाचस्पती डॉ. मिलिंद भोसुरे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींचा उत्साह वाढवण्यासाठी हे पुरस्कार दिले जातात, असे प्रमुख सल्लागार महादेव रानडे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अंजुषा पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रमुख सल्लागार महादेव गोविंद रानडे, डॉ. देशमुख व संचालिका डॉ. सुचिता पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. सामाजिक समता मानणाऱ्या पूनम कर्णिक बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या आहेत. विविध चित्रपटासाठी कथालेखन करण्याचा सल्ला अभिनेते अनंत जोग यांनी त्यांना दिला. त्यानुसार त्या अनेक कथा लिहित आहेत. सौ.पूनम कर्णिक यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


