कुळगाव बदलापूर नगरपालिकेने अनधिकृत बांधकामांविरोधात आक्रमक कारवाई करत उल्हास नदी परिसरातील अनाधिकृत चाळींवर तोडक कारवाई केली. न्यायालयाच्या आदेशानुसार या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून शुक्रवारी अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्य अधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या आदेशानुसार अतिक्रमण विरोधी पथक प्रमुख नरेंद्र सखी यांच्यासह पथकाने अंबरनाथ नगरपालिका प्रशासन भवनच्या संरक्षक भिंतीचा आसरा घेऊन तसेच बांगडी गल्ली आणि छाया रुग्णालयासमोरील रस्त्यावर
फेरीवाल्यांच्या टपऱ्यांवर कारवाई करून हातगाड्या व सामान जप्त करण्यात आले. तसेच महेंद्र नगर येथील अनाधिकृत दुकान गाळे जमीनदोस्त करून बेकायदेशीर बॅनर्सवर देखील कारवाई करण्यात आली. या धडक कारवाईमुळे स्टेशन परिसर, छाया रुग्णालय पोलीस स्टेशन धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृह परिसरातील रस्ते अनेक दिवसानंतर मोकळे झाले.
‘फेरीवाला झोन ‘धोरण निश्चित होत नसल्याने ‘फेरीवाला दादा’ त्या आड फेरीवाल्यांना रस्त्याच्या कडेला फुटपाथवर तसेच दुकानाच्या समोर बसण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊन प्रत्येकी पाचशे ते हजार रुपये हप्ता गोळा करत असतात. यामुळे स्थानिक स्वयंभू पुढारी, फेरीवाला गुंड आणि दुकानदारांच्या
सहकार्याने पालिकेच्या भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांना हाताशी धरत असल्याने फेरीवाल्यांचे प्रस्थ दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी, रुग्णांची देखील गय केली जात नाही. थोड़ा जरी धक्का लागला तरी हे फेरीवाले भांडणावर येतात. रेल्वे स्टेशन परिसरात प्रवासी, नागरिकांना या फेरीवाल्यांच्या दहशतीखाली
‘ फेरीवाला झोन ‘धोरण निश्चित होत नसल्याने ‘फेरीवाला दादा’ त्या आड फेरीवाल्यांना रस्त्याच्या कडेला फुटपाथवर तसेच दुकानाच्या समोर बसण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊन प्रत्येकी पाचशे ते हजार रुपये हप्ता गोळा करत असतात. यामुळे स्थानिक स्वयंभू पुढारी, फेरीवाला गुंड आणि दुकानदारांच्या सहकार्याने पालिकेच्या भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांना हाताशी धरत असल्याने फेरीवाल्यांचे प्रस्थ दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी, रुग्णांची देखील गय केली जात नाही. थोडा जरी धक्का लागला तरी हे फेरीवाले भांडणावर येतात. रेल्वे स्टेशन परिसरात प्रवासी, नागरिकांना या फेरीवाल्यांच्या दहशतीखाली मार्ग शोधावा लागतो. या वाहतूक कोंडीतून कोण मुक्त करणार? रस्ता मोकळा करून देण्याची जबाबदारी कोणाची? नगरपालिका आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करून नागरिकांना मार्ग मोकळा करून द्यावा अशी मागणी नागरिकांकडून प्रतिक्रियात्मक केली जात असते.


