सुर्या प्रादेश‍िक पाणी पुरवठा योजनेचा आढावा

भाईंदर – मुंबई महाप्रदेश विकास प्राधिकरण राबवित असलेल्या ४०३ द.ल.ली. क्षमतेच्या सुर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून मिरा भाईंदर महापालिका २१८ द.ल.ली. पाणी चेने येथील जलकुंभामध्ये प्राप्त होणार आहे. तेथून पुढे सदरचे २१८ द.ल.ली. पाणी शहरामध्ये समप्रमाणात वितरीत करण्यासाठीची वाढीव मुख्य जलवाहिन्या व वितरण व्यवस्था व जलकुंभाची कामे महापालिकेमार्फत केंद्र पुरस्कृत अमृत 2.0 अभियानांतर्गत प्रगतीपथावर
आहेत. ही कामे पुर्ण होण्यासाठी काही तांत्रिक कारणास्तव दिरंगाई झालेली आहे. सदर तांत्रिक कारणांचा आढावा घेऊन महापालिकास्तरावर योग्य ती कार्यवाही करण्याच्या दृष्टीकोनातून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या बुधवारी संबंधीत सर्व यंत्रणा (MMRDA, MSETCL, संबंधीत कंत्राटदार व प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार) यांची संयुक्तीक बैठक आयोजित करुन रखडलेली कामे पुर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून मार्गक्रमन करण्यात येते.
या अनुषंगाने दि. १० जून रोजी आढावा बैठक आयोजीत केलेली होती. सदर
बैठकीमध्ये सुर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून उपलब्ध होणारे पाणी मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील चेने जलाशयापर्यंत किमान ऑगस्ट 2026 अखेर पर्यंत उपलब्ध होण्याच्या दृष्टीकोनातून कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच सदरचे पाणी शहरात सद्यस्थितीत आवश्यक असणारे म्हणजेच सद्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात कमी पडणारे सुमारे 60 ते 70 द.ल.ली. पाणी शहरात वितरीत करण्यासाठी आवश्यक असणारे 10 जलकुंभ
सदरच्या जलकुंभासाठीच्या आवश्यक जलवाहिन्या व अनुषंगीक कामे ही ऑगस्ट 2026 अखेर पर्यंत पुर्ण करण्याचे निर्देश या कामाचे कंत्राटदार मे. इगल इन्फ्रा इंडीया लि. या कंपनीस देण्यात आलेले आहेत. तसेच कंत्राटदाराकडून काम पूर्ण करण्यामध्ये कोणत्याही प्रकारची हलगर्जी आढळून आल्यास त्याची गंभीर दखल घेऊन नियमानुसार योग्य ती कार्यवाही
करण्यात येईल, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

Scroll to Top