पेपर साठवलेल्या गोदामास भीषण आग 

नऊ गोदामे जाळून खाक

भिवंडी – भिवंडी तालुक्यातील पडघा परिसरातील वाहूली येथील जय भगवान गोडाऊन संकुला मधील पेपर साठवणूक केलेल्या गोदामाला गुरुवारी सायंकाळी भीषण आग लागली. या गोदामामध्ये मोठ्या प्रमाणावर कागदी पेपर व पुठ्ठा साठवला असल्याने पाहता पाहता ही आग संपूर्ण गोदामात पसरल्याने आगीत नऊ गोदामात साठवलेला पेपर साठा जळून खाक झाला आहे. 

आगीची माहिती मिळताच भिवंडी येथील तीन अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होत खाजगी टँकरच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. गोदामा मधून अचानक धुराचे लोट बाहेर येऊ लागल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण गोदाम परिसर धुराने व्यापून गेला. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.मात्र, आगीमुळे गोदामा मधील मोठ्या प्रमाणा वरील साहित्य जळून खाक झाला आहे. स्थानिक पडघा पोलिसांकडून सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.




Scroll to Top