पेंढरघोळ आश्रमशाळेत शालेय प्रवेशोत्सव साजरा 

वासिंद – पेंढरघोळ आश्रमशाळेत मोठ्या उत्साहात शालेय प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.

यामध्ये पहिलीच्या विद्यार्थ्यांना सजविलेल्या कारमध्ये बसवून शाळेत आणण्यात आले व या प्रवेशित विद्यार्थ्यांचे औक्षण करुन गुलाब‌पुष्प, चॉकलेट देऊन शाळेत प्रवेश करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांचे लेझीम तालावर स्वागत करण्यात आले

या नवीन प्रवेशित वि‌द्यार्थ्यांना पुस्तके, दप्तर, शुज, गणवेश व अंथरून-पांघरून देण्यात आले. तर दहावी -बारावी मध्ये प्रथम ते तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचे प्रवेशानिमित्त ऑनलाईन मार्गदर्शन ऐकविण्यात आले व नाशिक आयुक्तालय कार्यालयातून प्राप्त वार्षिक नियोजन आराखडा मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यानंतर उपस्थित विद्यार्थी व पालक वर्ग यांना शुभेच्छा देऊन सहभोजन देण्यात आले व शाळेय परिसर स्वच्छता, शालेय सोईसुविधा, शैक्षणिक व इतर उपक्रम आदी बाबत आढावा घेण्यात आला.

    या कार्यक्रमावेळी जेष्ठ नागरिक खंडू बरोरा, सहा.प्रकल्प अधिकारी एस.आर. जाधव,  कनिष्ठ विस्तार अधिकारी शरद लोणारी, वरिष्ठ लिपिक, ठाणे उदय भोईर, शाळेचे मुख्याध्यापक एस.बी. मोहिते आदी ग्रामस्थ व पालक वर्ग उपस्थित होते. तर यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेत्तर व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले होते.



Scroll to Top