स्वराज्य सोशल वेल्फेअर संस्थेच्या वतीने खरीड येथील विद्या प्रबोधिनी शिक्षण संस्था, शहापूर संचालित सदगुरू रिद्धीनाथबाबा माध्यमिक विद्यालय, या विद्यालयास पत्रे टाकून नवीन छप्पर तयार करण्यात आले तर त्याचा लोकार्पण सोहळा कार्यक्रम नुकताच पार येथे पडला.
शाळेच्या जुन्या इमारतीवरील पत्रे फुटून छप्पर नादुरुस्त झाले होते. त्यामुळे ऐन पावसाळ्यात गळती होत असून २८ वर्षापूर्वी शाळेवर घातलेल्या या छप्परमुळे अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. यासाठी शाळेचे मुख्याध्यापक एकनाथ तारमळे यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या या प्रयत्नामुळे तर स्वराज्य सोशल वेल्फेअर ऑर्गनायझेशन, मुंबई या संस्थेच्या वतीने जवळपास पाच लाखांच्यावर खर्च करीत नवीन पत्रे टाकून छप्पर तयार करून देण्यात आले आहे. तसेच वायुविजन प्रक्रियेसाठी चिमण्याही छप्परावर बसविण्यात आल्या असून त्यामुळे शालेय वर्गातील वातावरण अल्हाददायक निर्माण झाले आहे.
या झालेल्या नविन छप्पर कामाचे स्वराज्य संस्था संचालक संजय त्रिंबके यांच्या हस्ते अनावरण क या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्वराज्य सोशल वेल्फेअर संस्थेचे अध्यक्ष विजय कुमार कोणार, संचालक संजय त्रिंबके, प्रकल्प व्यवस्थापक भूषण पेडणेकर, अजित साकुंडे, विद्या प्रबोधिनी शिक्षण संस्थेचे सचिव काशिनाथ तिवरे, शाळेचे मुख्याध्यापक एकनाथ तारमळे, सल्लागार समिती सदस्य धनाजी गगे, संचालक आत्माराम गगे, पुंडलिक रिकामे आदी ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.


