मिरा भाईंदर महापालिकेच्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा अधिक गुणवत्तापूर्ण करणे, विद्यार्थ्यांना आधुनिक, सुसज्ज व तंत्रज्ञानाधारित शिक्षण उपलब्ध करून देणे तसेच महानगरपालिका शाळांचा सर्वांगीण विकास साधणे या उद्देशाने मिरा भाईंदर महानगरपालिका शाळा दत्तक योजना राबविण्याबाबत दिनांक १९ जून २०२६ रोजी महापौर श्रीमती
डिंपल विनोद मेहता यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार नरेंद्र मेहता यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील विविध खाजगी शाळांच्या ट्रस्टी व संस्थापकांसोबत महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले.
सदर बैठकीस उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील, अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत, उपायुक्त (शिक्षण) कविता बोरकर, सहाय्यक आयुक्त (शिक्षण) दिपाली पवार तसेच शहरातील विविध खाजगी शैक्षणिक संस्थांचे ट्रस्टी, संस्थापक व प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीदरम्यान महानगरपालिका शाळांना अधिक सक्षम, स्पर्धात्मक आणि विद्यार्थीकेंद्रित बनविण्यासाठी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः शैक्षणिक गुणवत्ता, डिजिटल शिक्षणाचा विस्तार, आधुनिक अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम, क्रीडा व सांस्कृतिक विकास, शालेय पायाभूत सुविधा तसेच प्रभावी शैक्षणिक व्यवस्थापन यासंदर्भात विविध सूचना व प्रस्ताव मांडण्यात आले. महापौर श्रीमती डिंपल विनोद मेहता यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले की, महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना खाजगी शाळांप्रमाणे दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे ही अत्यंत आवश्यकपूर्ण बाब आहे. समाजातील सर्व घटकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील असून शाळा दत्तक योजनेच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रातील अनुभवी संस्था आणि महानगरपालिका यांच्यातील सहकार्य अधिक बळकट होणार आहे.
आमदार नरेंद्र मेहता यांनीही या उपक्रमाचे स्वागत करत महानगरपालिका शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक संस्थांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून पुढाकार घेण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या उच्चल भवितव्यासाठी


