भिवंडीत चिकन शोरमा, पिझ्झा खाल्ल्याने अन्नातून विषबाधा झालेल्या रुग्णांची संख्या शनिवारी सकाळी १०७ वर पोहचली असून शनिवारी दुपारी महापौर नारायण चौधरी व आमदार महेश चौघुले यांनी स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात येऊन रुग्णांची विचारपूस करीत वैद्यकीय पथक कडून केल्या जात असलेल्या उपचारा बाबत माहिती घेतली. त्यानंतर अवघ्या काही तासात या अन्न विषबाधा प्रकरणी कारणीभूत ठरलेल्या फेमस शोरमा या हॉटेलवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने बुलडोझर चालवून उध्वस्त केले आहे
अन्न विषबाधा झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून स्वतःच्या फायद्यासाठी नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे. सुदैवाने कोणाचा जीव गेला नाही. फेमस शोरमा या ठिकाणी दररोज हजारो नागरिक जातात मग चालकाने सुद्धा खबरदारी घेण्याची गरज होती. पैसे कमावण्यासाठी काही ही करण्याच्या थराला हे जात आहेत. त्यामुळे नागरिकांनी घरातील अन्न खावे असा सल्ला देत हॉटेल चालकाकडे कोणताही परवाना नसल्याची बाब समोर आल्याने त्यावर कारवाई करण्याचे तत्काळ निर्देश दिले त्यानंतर दुपारी दोन वाजता फेमस शोरमा या हॉटेल वर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने बुलडोझर चालवून येथील दुकानाचे नुकसान केले आहे.


