मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त विद्यासागर विद्यालयात विकास प्रदर्शनी, चित्रकला स्पर्धा व गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा संपन्न

देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सेवा, सुशासन आणि विकासाला समर्पित १२ वर्षांचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी, कोपरी मंडलच्या वतीने विद्यासागर विद्यालय, ठाणे येथे विकास प्रदर्शनी, चित्रकला स्पर्धा आणि गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला आमदार मा. श्री. निरंजन डावखरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच सीएसएल ठाणे शहरचे श्री. विनोद टीकमानी यांची विशेष उपस्थिती होती.

विकास प्रदर्शनीच्या माध्यमातून केंद्र सरकारने गेल्या बारा वर्षांत पायाभूत सुविधा, डिजिटल इंडिया, गरीब कल्याण, महिला सक्षमीकरण, आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारताच्या दिशेने केलेल्या विविध विकासकामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली. प्रदर्शनीला नागरिक, विद्यार्थी आणि पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Scroll to Top