गुणवंत विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशन व प्लस इन्स्टिट्यूट तर्फे सत्कार

महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशन (MCOA) आणि प्लस इन्स्टिट्यूट (PLUS Institute) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २९ जून रोजी ठाणे येथे १० वी आणि १२ वीच्या गुणवत विद्यार्थ्याच्या गौरवासाठी विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दिमाखदार सोहळ्यात ठाणे जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसह सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याचे मुख्य आयोजक आणि प्रायोजक प्लस इन्स्टिट्यूटचे संचालक (MD) हरनेश देठिया हे होते. तसेच महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशनचे (MCOA) अध्यक्ष इर्शाद आगा आणि सचिव रहेमान सर यांच्या विशेष सहकार्याने व मार्गदर्शनाखाली हा सोहळा यशस्वीरित्या पार पडला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे महानगरपालिकेच्या नगरसेविका श्रीमती मझिया शानु पठाण आणि MCOA चे पदाधिकारी सचिन कर्नावट, प्रजेस ट्रोस्की सर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सुवर्ण यशाचे कौतुक करून त्यांना पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांना करिअर नियोजन आणि यशस्वी भवितव्य घडविण्यासाठी बहुमूल्य मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचा उत्साह, पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा अत्यंत आनंददायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. महाराष्ट्र क्लास ओनर एसोसिअशन व प्लस इन्स्टिट्यूटतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या १० वी व १२वी भूषणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी ठाणे, मुंब्रा आणि भिवंडी येथील MCOA च्या सर्व पदाधिकारी आणि शिक्षकांनी विशेष योगदान दिले.

Scroll to Top