भिवंडीत २८ लाखांचा गुटखा जप्त

ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाई

महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा विक्री व साठवणूक करण्यास मनाई असतानाही भिवंडी या मध्यवर्ती ठिकाणाहून गुटखा वाहतूक सर्रास पणे सुरू आहे. अशाच एका गुटखा तस्करी बाबत ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाल्याने खारबाव चिंचोटी रस्त्यावर केलेल्या कारवाईत २८ लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात यश मिळवले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक रोहन शेलार व पथकातील पोलिस कर्मचारी उमेश ठाकरे, हनुमान गायकर, आबेद अली सयद, जितेंद्र वारके हे भिवंडी तालुका पोलिस ठाणे हद्दीत गस्त खालील असताना पोलिस हवालदार उमेश ठाकरे यांना गुप्त बातमीदाराकडून चिंचोटी खारबाव रस्त्या वरील मेवात ढाबा येथे एका ट्रक मधून गुटखा तस्करी केली जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस पथकाने घटनास्थळी सापळा रचून केलेल्या कारवाईत संशयित आयशर टेम्पो क्रमांक एमएच १७ सीव्ही ६५०७आला असता त्याची झडती घेतली ट्रक मध्ये २८ लाख ८ हजार रूपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ट्रक चालक तौफिक अब्दुल शेख रा. श्रीरामपुर अहिल्या नगर यास ताब्यात घेऊन अन्न सुरक्षा अधिकारी कस्तुरी चिपळुणकर यांनी दिलेल्या तक्रारी वरून भिवंडी तालुका पोलिस ठाण्यात चालकासह ट्रक मालक जब्बार यांसह पुरवठादार व साठा खरेदी करणारे अशा चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Scroll to Top