टिटवाळा इंदिरानगर परिसरात रहिवाशांच्या घरात शिरले पाणी

सतत पडणाऱ्या पावसामुळे कल्याण डोंबिवली परिसरातील अनेक ठिकाणी पाणी साचत असून टिटवाळा पूर्वेतील इंदिरानगर स्मशानभूमी रस्ता परिसरात रस्त्यावरील गटाराचे सर्व सांडपाणी येथील पालांडे चाळीतील स्थानिक नागरिकांच्या घरात शिरले आहे. यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून घरात शिरलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे नुकसान झाले आहे.

या चाळीत राहणाऱ्या एका वयोवृद्ध महिलेच्या घरात देखील पाणी शिरले असून घरात शिरलेले पाणी काढण्याची कसरत नागरिकांना करावी लागत आहे. या साचलेल्या घाण पाण्यात लहानमुल, महिला, लहानमुलं, महिला, वयोवृद्ध नागरिकांना रहावे लागत असल्याने पावसाळ्यात घाणीच्या पाण्यातुन उदभवणारे संभाव्य आजार होण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत. तर गेल्यावर्षी देखील नागरिकांना या त्रासाचा सामना करावा लागला होता, तरीदेखील केडीएमसी प्रशासनाने नागरिकांच्या या समस्येवर तोडगा काढला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे असून लवकरात लवकर याबाबत योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.

Scroll to Top