‘आई महोत्सव’ मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा व मातृशक्तीचा भव्य सन्मान

प्रियजन गुणगौरव समिती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ठाणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने मुरबाड येथे आयोजित आई महोत्सव २०२६ व गुणवान विद्यार्थी सत्कार समारंभ’ मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला.

या कार्यक्रमाला राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी महिला शक्तीचा गौरव करत शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या कार्याचे विशेष कौतुक केले.

प्रियजन गुणगौरव समितीचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांच्या नेतृत्वाखाली समिती गेली ३० वर्षे विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवत आहे. या वर्षीच्या आई महोत्सवात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माता-भगिनींचाही विशेष सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला शहापूरचे आमदार दौलत दरोडा, राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हाध्यक्ष किसनराव तारमळे, कल्पना तारमळे, ज्योतीताई हिंदुराव, प्रियांका दामले यांच्यासह पक्षाचे सदामामा पाटील, नजिब मुल्ला, पदाधिकारी, कार्यकर्ते, पालक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी चंद्रकांत बोस्टे, प्रतिक हिंदुराव, सौरभ हिंदुराव, प्रशांत एगडे, पुंडलीक हरणे, विलास जाधव, अजय देशमुख, अमोल भवार, हर्षद शेळके तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी युवा नेते प्रतिक हिंदुराव यांच्या कार्याचे विशेष कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले.

Scroll to Top