बदलापुरात एफडीएची कारवाई

बदलापूरमध्ये अन्न व औषध प्रशासनाने दोन प्रमुख कारवाया केल्या आहेत. यामध्ये फ्लिपकार्ट १० मिनिट्सच्या डिलिव्हरी केंद्रावर बुरशी लागलेला पिझ्झा बेस मिळाल्यामुळे छापा टाकून कारवाई करण्यात आली आहे.

बदलापुरातील फ्लिपकार्ट १० मिनिट्स डिलिव्हरी केंद्रातून ग्राहकांना बुरशी लागलेला पिझ्झा बेस विक्रीसाठी दिला जात असल्याचा आरोप मनसे बदलापूर शहर अध्यक्ष निशांत मांडवीकर यांनी केला. दरम्यान, या तक्रारींची गंभीर दखल घेऊन एफडीएच्या पथकाने केंद्रावर धाड टाकली आणि खाद्यान्नाच्या दर्जाची तपासणी केली. त्यावेळी पिझ्झा बेसमध्ये बुरशीजन्य पदार्थ आढळून आल्याने त्याची डिलिव्हरी तत्काळ थांबवून फ्लिपकार्ट डिलिव्हरी शॉपला सिल करण्यात आले.

Scroll to Top