कातबाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप

येथील सामाजिक कार्यकर्ते श्याम धानके, शिवसेना (उबाठा) पक्षाचे वासिंद (ग्रामीण) विभाग प्रमुख रघुनाथ मसणे तसेच युवा सामाजिक कार्यकर्ते सचिन मांडवी यांच्या वाढदिवसानिमित्ताने संयुक्तरीत्या कातबाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.

गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीपर हातभार लागावा यासाठी दहागांव येथील सामाजिक कार्यकर्ते श्याम धानके, शिवसेनेचे विभागप्रमुख रघुनाथ मसणे, युवा सामाजिक कार्यकर्ते सचिन मांडवी यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून कातबाव येथे विद्यार्थ्यांना वह्या, शाळेय साहित्य व खाऊ वाटप केले. सदर, कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते श्याम धानके, विभाग प्रमुख रघुनाथ मसणे, युवा सामाजिक कार्यकर्ते सचिन मांडवी, जेष्ठ नागरिक खंडू नवले, प्रभाकर लहाने, गुरुनाथ धानके, शरद पवार, विष्णू मदगे युवा कार्यकर्ते दिनेश घारे, योगेश मांजे, रोहिदास भोसले, अजय धानके, संदीप भांगरे, मनोज मदगे, किरण भांगरे, प्रसाद पवार आदी जण उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार रघुनाथ मसणे, सूत्रसंचालन शिक्षिका प्रतिक्षा चंदे यांनी केले तर या कार्यक्रमासाठी संजय भोर, योगेश पवार, संदीप भांगरे, जयवंत मसणे, नवनाथ चौरे यांनी परिश्रम घेतले.

Scroll to Top