चिकणघर गावठाण मधील रस्ते खड्डेमुक्त करण्याची शिवसेनेची मागणी

प्रभाग क्र. २७ चिकणघर गावठाण मधील म्हसोबा रिक्षा स्टँड ते नामदेव विहार पर्यंतच्या रस्त्याच्या एका बाजुने मोठमोठे टॉवर उभे राहिले असुन काही ठिकाणी फुटपाथ बनले आहेत. परंतु रस्त्याच्या दुसऱ्या बाजुने गटार किंवा फुटपाथ नसल्याने पावसाचे पाणी जमा होऊन मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरीकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. तसेच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुक सुरु असल्याने वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.

या रस्त्याच्या पुढे गॅलेक्सी रेसिडेन्सी, मंगेशी ईलाईट, मंगेशी वर्ल्ड यांसारखे मोठे रेसिडेन्सी कॉम्प्लेक्स असल्याने नागरी वस्ती झपाट्याने वाढली आहे. सर्व करदात्या नागरिकांना मुलभुत सोयी सुविधा देणे महापालिकेचे कर्तव्य आहे. त्या अनुशंगाने या रस्त्याच्या संबंधीत विभागाने पहाणी करून रस्ता रुंदीकरणाबाबत योग्य ते पाऊल उचलून नागरिकांना सहकार्य करण्याची मागणी चेतन म्हामुणकर यांनी केली आहे.

Scroll to Top