गुरुवारी २३ जुलै रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती भिवंडी महापालिकेच्या तळ मजल्यावर साजरी करण्यात आली.
यावेळी सहायक आयुक्त नितीन पाटील यांच्या हस्ते व नगरसेविका रोमा आळशी यांच्या उपस्थितीत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी नगरसचिव अजय पाटील, मुख्य उद्यान अधिकारी निलेश संख्ये, प्रशासन अधिकारी सौदागर शिखरे, समाज कल्याण विभाग प्रमुख मिलिंद पळसुले, समाजसेवक निलेश आळशी आणि महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


