स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद ठाणे येथे अभिवादन

जिल्हा परिषद, ठाणे येथे आज, दि. २२ जुलै, २०२६ रोजी स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात त्यांच्या प्रतिमेस मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही स्वर्गीय अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. त्यांच्या कार्याचा आदर्श समाजासाठी प्रेरणादायी असून, सार्वजनिक जीवनात त्यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण यावेळी करण्यात आले.

या कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे,मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, कार्यकारी अभियंता दीपाली घोरपडे तसेच जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थितांनी स्वर्गीय अजित पवार यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या विचारांचा आदर्श समाजजीवनात जोपासण्याचा संकल्प व्यक्त केला.

Scroll to Top