मानवतेच्या प्रति निरंतर निष्काम सेवांचे योगदान देणाऱ्या संत निरंकारी मिशनतर्फे डीएव्ही कॉलेज येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी करण्यात आले. या शिबिरात कांजुरमार्ग आणि भांडुप परिसरातील निरंकारी भक्तांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या बॅनरखाली आयोजित या शिबिरामध्ये संत निरंकारी ब्लड बँक, विले पार्ले यांनी रक्त संकलन केले. शिबिराचा शुभारंभ स्थानिक सेक्टर संयोजक श्रीधर पाटील यांच्या उपस्थितीत निरंकार ईश्वराच्या प्रार्थनेने करण्यात आला. या प्रसंगी स्थानिक बँच मुखी व आजुबाजुच्या शाखांचे अनेक मुखी, प्रबंधक व सेवादल अधिकारी उपस्थित होते.
स्थानिक नगरसेविका श्वेता पावसकर यांनी या शिबिराला सदिच्छा भेट दिली व संत निरंकारी मिशनतर्फे निष्काम भावनेने केल्या जाणाऱ्या विविध सेवांची प्रशंसा केली.


