डॉ. ‘महसूल यंत्रणेत वर्षभर कामाचा प्रचंड ताण असतो, मात्र या व्यापात अधिकाऱ्यांनी आपल्या शारीरिक व नानसिक आरोग्याकडे आणि कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नये, असा आपुलकीचा व नोलाचा सल्ला ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिला. ताणतणावाचे मुयोग्य नियोजन करून नागरिकांना कायदेशीर व संवेदनशील सेवा देणे हेच प्रशासनाचे मुख्य ध्येय असले पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.
जनतेची कामे विहित वेळेत पूर्ण करून महसूल वसुलीचे उद्दिष्ट यशस्वीरीत्या साध्य करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ०१ ऑगस्ट हा ‘महसूल दिन’ अतिशय उत्साहात आणि गरिमापूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाचव्या मजल्यावरील पमिती सभागृहात ठाणे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, उपजिल्हाधिकारी वैशाली माने, उपजिल्हाधिकारी म्हस्केराव पाटील, तहसीलदार सचिन चौधर, तहसीलदार सुजाता शिंदे यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वप्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. तसेच ०१ ऑगस्ट या महसूल दिनानिमित्त दीपप्रज्वलनाने या सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला.
ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी महसूल दिनाच्या शुभेच्छा देत प्रशासकीय कामकाज, ताणतणाव व्यवस्थापन आणि व्यक्तिगत जीवन यातील समतोल कसा साधावा याबद्दल मार्गदर्शन केले. त्यांनी स्पष्ट केले की, महसूल विभागात कामाचे प्राधान्यक्रम सतत बदलत असतात; निवडणूक, जनगणना किंवा विविध प्रकल्प हाताळताना कर्मचाऱ्यांना वर्षभर अखंडितपणे काम करावे लागते. अशा परिस्थितीतही पारदर्शकता आणि लोकाभिमुखता जपणे हे प्रशासनाचे मुख्य ध्येय असले पाहिजे.
प्रशासकीय यशस्वितेसाठी त्यांनी ‘५-पी’ (5-P) हे विशेष सूत्र मांडले. यात पीपल (जनता), पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह (लोकप्रतिनिधी), प्रेस (माध्यमे) आणि पर्सनल (सहकारी अधिकारी/कर्मचारी) यांच्याशी सुयोग्य समन्वय साधल्यास अत्यंत क्लिष्ट आणि आव्हानात्मक परिस्थिती देखील सहजतेने हाताळता येते, असे त्यांनी नमूद केले.
सेच, प्रशासनातील वाढत्या ताणतणावावर भाष्य करताना त्यांनी स्वतःच्या अनुभवाचा संदर्भ देत अधिकाऱ्यांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये असा सल्ला दिला. कामाच्या व्यापात नियमित व्यायाम, संतुलित आहार, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि स्वतःचे मानसिक आरोग्य जपले, तरच माणूस प्रशासकीय कर्तव्ये अधिक सक्षमतेने आणि आनंदाने पार पाडू शकतो, असे मत त्यांनी मांडले.


