शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त व शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शिवसेना शाखा बाळकुम व जनहित फाऊंडेशन ठाणे यांच्या संयुक्त शिवसेना ठाणे उपजिल्हाप्रमुख व जनहित फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनिल पाटील यांच्या पुढाकाराने ठाणे महापालिकेच्या विविध शाळांतील सुमारे १५०० विद्याथ्यांसाठी भव्य चित्रकला स्पर्धा, गुणगौरव सोहळा तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना भरगच्च शैक्षणिक साहित्य आदींचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपून शिवसेना पक्षप्रमुखांना अनोख्या शुभेच्छा दिल्या.
यंदाचे हे अठरावे वर्ष असून सलग सात दिवस हा सामाजिक उपक्रम महापालिकेच्या बाळकुम शाळा क्र.६०, ११२ व माध्यमिक शाळा क्र.४, ढोकाळी शाळा क्र. ६१ व माध्यमिक शाळा क्र.६, पानखंडा शाळा क्र.५९, टकारडा शाळा क्र. १०१, माजिवडा शाळा क. ४३ व कोलशेत शाळा क्र.५२ आदी शाळांत राबविण्यांत येऊन १५०० विद्यार्थ्यांना विको वज्रदंती टुथ पेस्ट व टूथ ब्रश, कोलगेट टूथपेस्ट व टूथ ब्रश, डाबर रेड दंतमंजन, अॅलो वेरा जेल, फाईल, फोल्डर्स, वह्या, पेन, पेन्सिल्स, वॉटर बॉटल्स, पॉड्स, ब्रिटानिया बिस्किटे, गुड डे, केकस्, डाबर रियल ज्यूस, छत्र्या, रेनकोटस्, तसेच पेपर मेट पेन, मार्कर्स, हायलायटर्स आदी भरगच्च शैक्षणिक साहित्य वाटप करण्यांत आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक ठाणे उपजिल्हाप्रमुख व जनहित फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनिल पाटील यांनी केले. छायाचित्रण संतोष धुरी तर सूत्रसंचालन मकरंद सारोळकर यांनी केले. सदर प्रसंगी शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे, सनई चौघडे या झी टी. व्ही. वरील मराठी मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेते राज हंचनाळे, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, महिला जिल्हा संघटीका रेखा खोपकर, उप जिल्हा संघटीका महेश्वरी तरे, शहरप्रमुख तथा प्रवक्ते अनिष गाढवे, नगरसेविका नंदिनी विचारे, संजय तरे, मा. संपर्कप्रमुख सुभाष म्हसकर, कोरस कंपनीचे मॅनेजर प्रदीप पांडे, आयटीसी कंपनीचे जोसेफ नालकारा, मुथ्युट फायनान्सचे रिजनल मॅनेजर मोहन कुमार, सी.एस.आर मॅनेजर सोनू कुमार, विजयालक्ष्मी, अमित विश्वकर्मा, उपशहरप्रमुख चंद्रकांत नार्वेकर, रमेश वाडेकर, उपशहर संघटीका अनिता प्रभू, संपर्कप्रमुख सुनिल भोईर, शाखाप्रमुख संतोष भोईर, मधुकर भोईर, अजय पाटील, रंजन मढवी, विनय पाटील, चेतन चौधरी, जयेश घरत, रमेश म्हात्रे, मनोहर पाटील, प्रकाश घरत, अॅड. प्रज्ञेश वाडेकर, विभाग प्रमुख महेंद्र पाटील, उपविभाग प्रमुख संदीप धरणे, गुणानाथ जोशी, युवासेनेचे तन्मय मणेरा, महिला आघाडीच्या संपदा उरणकर, नंदा कोथळे, राजश्री सुर्वे, कविता नार्वेकर, अंजली पटवर्धन, सुर्यकला पाटील, वर्षा पाटील, जयश्री भोईर, कल्पना पाटील, शाखा संघटिका अपर्णा भोईर, ज्येष्ठ नागरीक अण्णा पाटील, जनार्दन चव्हाण, गजानन भोईर, दत्तात्रय भोईर, चंद्रकांत पाटील, मुरबाडचे माजी सरपंच बाळकृष्ण भोईर, सर्व शाळांच्या मुख्याध्यापिका, शिक्षक वृंद व प्रभागातील नागरिक उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांसोबत १० किलो व ५ किलोचा केक कापून पक्षप्रमुख श्रीमान उध्दवजी ठाकरे साहेब यांना शुभेच्छा दिल्या.


