शेलार येथे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक थेरपी सेंटर सुरू

जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत समग्र शिक्षा अभियानाच्या समावेशित शिक्षण विभागामार्फत पंचायत समिती भिवंड मार्फत शेलार येथे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठ अत्याधुनिक बहुउद्देशीय संसाधन कक्ष् (थेरपी सेंटर) नव्याने सुरू करण्यात आला या केंद्राचे उ‌द्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

या थेरपी सेंटरमुळे परिसरातील दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्य गरजेनुसार विविध प्रकारच्या थेरपी शैक्षणिक मार्गदर्शन आणि पुनर्वसन सेव एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असून त्यांच्या सर्वांगीण विकासाला नवी दिश मिळणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान गटशिक्षणाधिकारी वैशाली डोंगरे या होत्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा परिषद ठाणेच समावेशित शिक्षण (IE) जिल्हा समन्वयक अनिल कुन्हाडे, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका देवयानी पाटील, शारदा विद्यालय, शेलारच्या मुख्याध्यापिका ज्योती पाटील, जगन्नाथ चोरगे, विष्णू पाटील, डॉ. विनायक पाटील, विषयतज्ज्ञ योगिता चौधरी, तालुका समन्वयक (समावेशित शिक्षण) निलम पिसाळ, शंकर मोकाशी, स्वाती जाधव, गायत्री भोपी, मनिषा गायकवाड, मेघा रणदिवे (विशेष शिक्षक) तसेच पालक, विद्यार्थी आणि शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना वेळेवर आणि सातत्यपूर्ण थेरपी उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. यापूर्वी विद्यार्थ्यांच्या पालकांना फिजिओथेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपी साठी दूरवर जावे लागत असल्याने वेळ, खर्च आणि गैरसोयींचा सामना करावा लागत होता. मात्र, शेलार येथील या अत्याधुनिक थेरपी सेंटरमुळे परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, शैक्षणिक सहाय्य आणि पुनर्वसन सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार असून पालकांचा आर्थिक आणि मानसिक ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

या केंद्राच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, बौद्धिक, भाषिक, शारीरिक, मानसिक तसेच सामाजिक विकासाला निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. प्रत्येक दिव्यांग विद्यार्थ्याला त्याच्या क्षमतेनुसार प्रगतीची संधी उपलब्ध करून देणे हे समग्र शिक्षेचे उद्दिष्ट असून हे केंद्र त्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Scroll to Top