आमदार संजय केळकर यांनी काढला समन्वयातून मार्ग
ठाण्यातील चिखलवाडी येथील १४ वर्षे रखडलेला एसआरए प्रकल्प महिन्याभरात सुरू करण्याची कबुली विकासकाने दिली असून प्रशांत नगर येथील प्रकल्पग्रस्त रहिवाशांना दिवाळीपर्यंत घरे मिळण्याची चिन्हे असल्याने रहिवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.
भाजपच्या खोपट येथील आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांनी ही माहिती दिली. चिखलवाडी येथील १४ वर्षे प्रलंबित असलेल्या प्रकल्पाचे विकासक आणि रहिवाशांची संयुक्त बैठक घेण्यात आली. यावेळी समस्या आणि त्यावरील उपाययोजना याबाबत चर्चा करण्यात आली. येत्या १५ दिवसांत सर्व आवश्यक परवानग्या घेऊन काम सुरू करण्यात येईल, तसेच प्रलंबित भाडे देखील रहिवाशांना देण्यात येईल, अशी कबुली विकासकाने दिल्याचे श्री. केळकर यांनी सांगितले. प्रशांतनगर येथील प्रकल्प देखील १० वर्षे रखडला असून येथील रहिवाशांचे प्रतिनिधी, विकासक, अर्थसाह्य करणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी आणि एसआरए अधिकारी यांची देखील संयुक्त बैठक घेण्यात आली असून येत्या दिवाळीत रहिवाशांना हक्काचे घर मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान शुभारंभ इमारतीचे मालक, रहिवासी आणि विकासक यांची देखील बैठक घेऊन चर्चा करण्यात आल्याचे ते म्हणाले.
ठाणे शहरातील सुमारे २० एसआरए प्रकल्पग्रस्त रहिवासी संपर्कात असून आधी समन्वयातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जातो. अन्यथा कठोर भूमिका घेऊन प्रकल्प मार्गी लावावा लागतो. काही प्रकल्प सुरू करण्यात यश आले असून इतर प्रकल्पांसाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेले विकासक एक प्रकल्प अर्धवट सोडून दुसरा प्रकल्प सुरू करतात, यात रहिवाशांची फसवणूक होते. अशा विकासकांना


