जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून दिव्यातील मराठा वॉरियर्स गडकिल्ले संवर्धक, महाराष्ट्र राज्य तसेच महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांमध्ये दोन दिवसीय सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत आदिवासी कुटुंबांना शालेय साहित्य तसेच विविध घरगुती उपयोगाच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले.
संस्थेचे प्रेरणास्थान एकनाथ तुकाराम भगत (बाबा) तसेच अजित भगत यांच्या सहकार्याने आणि संस्थेच्या पदाधिकारी, सभासदांच्या अथक परिश्रमातून हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. आदिवासी समाजातील गरजू कुटुंबांपर्यंत थेट पोहोचून त्यांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन साहित्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाच्या माध्यमातून आदिवासी पाड्यांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या कुटुंबांना घरगुती वापराच्या वस्तू देण्यात आल्या. सामाजिक बांधिलकी जपत गरजू घटकांना मदतीचा हात देण्याचा हा उपक्रम असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या उपक्रमावेळी संस्थापक तथा अध्यक्ष राहुल द. खैर, योगेश राणे, रोहित जाधव, अभिजीत मांडवकर, नितीन शिगवण, सुमित गावडे, अल्पेश पवार, अक्षय भोसले, कलप्पा,


