पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त धनगर प्रतिष्ठान, ठाणे जिल्हा यांच्या वतीने ठाण्यातील मासुंदा तलाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटाच्या माहिती फलकाच्या अनावरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या माहिती फलकाचे उद्घाटन आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते करण्यात आले.
धनगर प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आलेल्या मागणीनुसार आमदार निरंजन डावखरे यांच्या आमदार निधीतून मासुंदा तलाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकालगत असलेल्या घाटाच्या फलकाचे सुशोभीकरण करण्यात आले. तसेच येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट’ असे नामफलक आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची माहिती देणारा माहिती फलक उभारण्यात आला आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून या माहिती फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी समाजाचे नेते शंकरभाई वीरकर, बाबासाहेब दगडे, संदेश कवितके, धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे, गोविंद पाटील, भाजपा भटक्या विमुक्त आघाडी ठाणे शहर जिल्हाध्यक्षा उज्वला गलांडे, भाजपा मुंबई प्रदेश सचिव निहारिका कोंदले, भाजपा वर्तकनगर मंडळ महिला अध्यक्षा वर्षा माने, धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या सचिव गायत्री गुंड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


