भारताच्या
स्वातंत्र्यदिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारतीच्या प्रांगणात महापौर सुजाता पाटील यांच्या शुभहस्ते आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण संपन्न झाले.
याप्रसंगी आरोग्य समिती सभापती डॉ. जयाजी नाथ, महिला व बालकल्याण समिती सभापती सलुजा सुतार, नगरसेविका नेत्रा शिर्के, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे, शहर अभियंता शिरीष आरदवाड, प्रशासन विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे यांच्यासह सर्व विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारीवृंद तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस, अग्निशमन जवान व महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सुरक्षारक्षक यांच्या पथकांची याप्रसंगी लक्षणीय उपस्थिती होती.
ध्वजारोहणानंतर देशातील सर्वात स्वच्छ शहरांच्या सुपर स्वच्छ लीग या विशेष कॅटेगरीत मानांकनप्राप्त शहर तसेच माझी वसुंधरा अभियानात राज्यात व्दितीय क्रमांकाचे पर्यावरणशील शहर म्हणून मानांकित नवी मुंबई शहराच्या नावलौकिकात समर्पित भावनेने काम करून भर घालणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य, उद्यान, पाणीपुरवठा व मलनि:स्सारण व्यवस्थापन विभागातील १२ गुणवंत कर्मचा-यांचा विशेष सन्मान करण्यात आला.


