दिव्यात विद्यार्थ्यांना वह्या, नागरिकांना रेशन किटचे वाटप

भारतीय औचित्य साधून भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा अनुसूचित जाती जिल्हा सरचिटणीस तथा टायगर ग्रुप ठाणे जिल्हाध्यक्ष सतीश केळशीकर यांच्या वतीने दिवा पश्चिम येथे सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले, तर नागरिकांना रेशन किटचे स्वातंत्र्यदिनाचे वाटप करून अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने केवळ उत्सव न साजरा करता समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. वह्या मिळाल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत झाली, तर रेशन किटमुळे गरजू कुटुंबांना दिलासा मिळाला.

या कार्यक्रमास दिवा भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच दिवा कोकण प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुषार गायकर, प्रमोद चव्हाण, संकेत गमरे, आंतरराष्ट्रीय वुमन राइट्स ठाणे जिल्हा सरचिटणीस साधना सिंग यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

Scroll to Top