श्रावण महिन्याच्या पवित्र पर्वाची सुरुवात मुरबाड तालुक्यातील प्रसिद्ध श्री तीर्थक्षेत्र संगम येथील महादेव मंदिरात भगवान शिवशंकराचे मनोभावे दर्शन घेऊन आमदार किसन कथोरे यांनी केली. यावेळी विधिवत पूजा – अर्चा करून भगवान महादेवाचे त्यांनी आशीर्वाद घेतले.
श्रावण महिन्याच्या निमित्ताने श्री तीर्थक्षेत्र संगम येथे भाविकांची मोठी गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर परिसरात सुरू असलेल्या विविध विकासकामांची आ. कथोरे यांनी पाहणी केली. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला. तसेच विकासकामे दर्जेदार, नियोजनबद्ध आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. धार्मिक महत्त्वासोबत पर्यटन विकासालाही प्राधान्य श्री तीर्थक्षेत्र संगम हे मुरबाड तालुक्यातील महत्त्वाचे धार्मिक आणि पर्यटनस्थळ आहे. या परिसराचा विकास करताना भाविकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच परिसराचे धार्मिक महत्त्व, नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यावरणाचे जतन करण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. यावेळी मा. जिल्हा परिषद सदस्य उल्हास बांगर, माजी पंचायत समिती सभापती दीपक पवार, जितेंद्र भावार्थे, तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन संतोष पवार, माजी नगराध्यक्ष मोहन सासे, युवा नेते अनिल घरत, सुहास भाऊ मोरे अशोक मोरे, भाई तेलवणे, सा. बा उप अभियंता संजय कोरडे, जिल्हा परिषद उप अभियंता उपअभियंता विवेकानंद जडे, विभागातील ग्रामस्थ तसेच सरपंच उपसरपंच उपस्थित होते इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


