येथील जि. प. तसेच सर्व माध्यमिक शाळा, पोलीस स्टेशन, वन विभाग कार्यालय, रेल्वे स्थानकासारख्या प्रमुख ठिकाणी सालाबादप्रमाणे ध्वजारोहणाचे कार्यक्रम तर पार पडलेच शिवाय या स्वतंत्रता दिवसाचे औचित्य साधून कसारा आरपीएफ कार्यालयामार्फत वृक्षारोपण, स्वच्छता रॅली सारखे स्वागतार्ह कार्यक्रम संपन्न झाले.
येथील जिल्हा परिषद शाळा डॉ. आंबेडकर नगर मधील विद्यार्थ्यांना स्थानिक रिपाई आणि वंचित बहुजन आघाडी शहर शाखेच्या वतीने मोफत वह्या वितरण करण्यात आले.


