ग्रामपंचायत विभागाकडून शिक्षक मुकेश दामोदरे यांचा गौरव

ग्रामपंचायत विभागाच्या वतीने वासिंद येथील सरस्वती विद्यालयातील सह शिक्षक मुकेश दामोदरे यांचा गौरव करण्यात आला.

ग्रामपंचायत विभागाकडून विविध आयोजित उपक्रम, राष्ट्रीय कार्यक्रम, शिबीरे, शासकीय अभियान यामध्ये सक्रिय सहभाग व योगदानाबद्दल १५ ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी मुकेश दामोदरे यांचा तसेच याबरोबरच राष्ट्रीय ध्वजारोहण कार्यक्रमासाठी सहकार्य करणारे विजय भेरे, कलाशिक्षक सुनिल काठोळे, क्रीडा शिक्षक दौलत चव्हाण यांचाही ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र म्हसकर, उपसरपंच विशाखा शेलार, ग्रामपंचायत अधिकारी रमेश सासे आदी पदाधिकारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

Scroll to Top