नगरसेवक शैलेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यात धान्य वाटप

दिवा उपशहर प्रमुख व नगरसेवक शैलेश मनोहर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कैलास पाटील आणि दिवा विकास प्रतिष्ठान, शिवसेना शाखा – रिलायन्स टॉवर यांच्या वतीने समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. दिव्यातील रेशन कार्डच्या झेरॉक्स दाखवून श्री सद्गुरु समर्थ कन्स्ट्रक्शन ऑफिस, वारेकर शाळेजवळ, मुंब्रा देवी कॉलनी, दिवा पूर्व येथे धान्य वाटप करण्यात आले. या उपक्रमातून अनेक गरजू कुटुंबांना मदत मिळाली. वाढदिवसानिमित्त आयोजित या समाजोपयोगी कार्यामुळे स्थानिक नागरिकांनी शैलेश पाटील, कैलास पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले.

Scroll to Top