रेल्वे आयुक्त कार्यालय मुंबईचे वरिष्ठ अधिकारी रांका, भूषण पाटील, आसनगाव जी आर पी जाधव, सेक्शन सीसीआय विकास कुमार, आरपीएफ कसाराचे राम लखन कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्टेशन मॅनेजर रोहित उबाळे यांनी आपल्या सहीचे पत्रक देऊन येथील वाहनतळ कमिटीला मान्यता देण्यात आली आहे. रिपाइं महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली समितीच्या अध्यक्ष व सरचिटणीस पदाची जबाबदारी अनुक्रमे राजेंद्र उबाळे व संतोष कर्डक यांच्यावर सर्वानुमते सोपविण्यात आली आहे, तर इतरही काही समजदार वाहन मालकांना कार्यकारिणीत सामावून घेण्यात आले आहे.
यावेळी रांका यांनी उपस्थित कमिटीला मार्गदर्शन करताना सांगितले की, मनमानी भाडे न आकारता रोजचे प्रवासी भाडे निश्चित करण्यात यावे, गाडीची कागदपत्रे क्लियर असावीत आणि प्रवाशांना आदरपूर्वक वागणूक द्यावी. पार्किंग परिसरामध्ये चालक-मालक अथवा गाडी भरणारे मदतनीसां पैकी कोणीही मद्य प्राशन केलेले आढल्यास आणि प्रवाशांची कोणतीही तक्रार आल्यास अथवा पार्किंगचा परिसर सोडून रस्त्यावर कोणतीही गाडी उभी असल्यास त्या गाडीवर व चालकावर रेल्वे कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल, असा सज्जड दमही देण्यात आला आहे.


