मनीषा वाळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव व शालोपयोगी वस्तूंचे वाटप

माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव व शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.

अंबरनाथ पूर्व भागातील लोकमान्य टिळकनगर येथील जगदंब मित्र मंडळाच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष उमेश यादव यांच्या अध्यक्षतेखाली टिळकनगर सार्वजनिक श्री गणेश मंडळाच्या सभागृहात, गुरुवार २७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी माजी नगराध्यक्षा मनिषा वाळेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, माजी नगरसेवक, शिवसेना (शिंदे गट), भिवंडी लोकसभा मतदार संघ युवासेना संपर्क प्रमुख अॅड. निखिल अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी नगराध्यक्षा अंबरनाथ नगरपरिषद प्रज्ञा बनसोडे तसेच युवासेना शहर उप अधिकारी स्वप्नील गुंजाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत विभागातील १ली ते १२ वी या इयत्तेत शिकणाऱ्या अंबरनाथ विभागातील विविध शाळेतील विद्यार्थी जे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उर्तीण झालेले होते, या विद्यार्थ्यांच्या गुणगौरवाप्रित्यर्थ या सर्व विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू, व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. तसेच विभागातील घरकाम करणाऱ्या महिला कामगारांना साडी देऊन सन्मानीत करण्यात आले.

या प्रसंगी व्यासापीठावर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, लोकमान्य टिळक नगर यांचे अध्यक्ष अरविंद निकम, सहजीवन ज्येष्ठ नागरीक संघाचे माजी खजिनदार मल्लिकार्जुन जोजन काका, समाजसेविका आरती उमेश यादव, योगिता देशमुख, अश्विनी वाडकर, वैशाली दगडे, विनिता निवळे आदी व्यासपीठावर प्रमुख पाहूणे म्हणून आवर्जून उपस्थित होते.

Scroll to Top