विद्यार्थिनींनी बांधली कृतज्ञतेची राखी

विद्यार्थिनींनी बांधली कृतज्ञतेची राखी पिसे आश्रमशाळेत जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडून 'जेईई-नीट'चे धडे

पिसे आश्रमशाळेत जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडून ‘जेईई-नीट’चे धडे

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज भिवंडी तालुक्यातील पिसे येथील शासकीय प्राथमिक आश्रमशाळेला सदिच्छा भेट देऊन तेथील शैक्षणिक व भौतिक सुविधांची पाहणी केली. या दौऱ्यात त्यांच्या समवेत भिवंडीचे उपविभागीय अधिकारी अमित सानप आणि तहसिलदार अभिजीत खोले, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेची इमारत, बांधकामाचा दर्जा, शिक्षक संख्या, विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि मूलभूत सोयीसुविधांचा थेट आढावा घेतला. वर्गामध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांनी सातत्यपूर्ण अभ्यासाचे महत्त्व पटवून दिले. या आश्रमशाळेत सध्या सुमारे २०० विद्यार्थिनी जेईई आणि नीट या अत्यंत महत्त्वाच्या प्रवेश परीक्षांची विशेष तयारी करत आहेत. स्वतः वैद्यकीय पार्श्वभूमी असलेल्या जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी या विद्यार्थिनींशी संवाद साधताना अभ्यासाचे अचूक नियोजन, वेळेचे व्यवस्थापन आणि स्पर्धा परीक्षांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचे तंत्र याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. आयुष्यात यश मिळवण्यासाठी अभ्यासाला कोणताही पर्याय नसून सातत्य आणि कठोर परिश्रमाने कोणतेही शिखर गाठता येते, असा प्रेरणादायी कानमंत्र त्यांनी दिला.
या संवादादरम्यान विद्यार्थिनींनी शाळेत अद्ययावत संगणक कक्ष, विज्ञान प्रयोगशाळा आणि बहुउद्देशीय सभागृह सुरू करण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी यावर तातडीने सकारात्मक पाऊल उचलत, जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून या सर्व सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून देण्याचे निर्देश प्रकल्प अधिकाऱ्यांना दिले.

Scroll to Top