कपिल पाटील फाऊंडेशन कडून लाखोंच्या बक्षिसांची खैरात
भिवंडीत दहीहंडी उत्सवाचा थरार अनुभवायला मिळणार असून कपिल पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून लाखो रुपयांची खैरात गोविंदा पथकांवर केली जाणार असून गोविंदा पथकांची सुरक्षितता विचारता घेऊन विशेष सोयी उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती कपिल फाउंडेशनचे अध्यक्ष नगरसेवक सुमित पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. यावेळी फाउंडेशनचे सदस्य प्रभाग समिती सभापती ऐंड वैभव भोईर उपस्थित होते.
कपिल पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून समन्वय युवा प्रतिष्ठान, संस्कार प्रतिष्ठान व स्व. किरण देशमुख मित्र मंडळ यांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज चौकात साजऱ्या केल्या जाणाऱ्या दहीहंडी उत्सवाचे यंदा १९ वे वर्ष आहे. मागील वर्षी लहान मोठ्या १४८ गोविंदा पथकाने हजेरी लावली होती. यंदा गोविंदा पथकांच्या सूचनांचा विचार करून आठ व नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकांसाठी स्वतंत्र वेगळी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी यावेळी दोन सेफ्टी बेल्ट उपलब्ध असणार आहेत. तर महिला पथकांची संख्या यंदा वाढल्याने त्यांच्यासाठी तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या आदिवासी गोविंदा पथकांसाठी स्वतंत्र चषक व बक्षीस रक्कम दिली जाणार असल्याची माहिती सुमित पाटील यांनी दिली आहे.
या वर्षी २ लाख ८३ हजार रुपयांचे मुख्य पारितोषिक असून पाच थर, सहा थर, सात थर, आठ थर लावणाऱ्या गोविंदा पथकांना अनुक्रमे ५ हजार, ७ हजार, १० हजार व ५० हजार रुपयांची पारितोषिक दिली जाणार असल्याची माहिती आयोजक अँड वैभव भोईर यांनी दिली असून गोविंदांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी दोन रुग्णवाहिकांसह वैद्यकीय पथक तैनात राहणार असल्याचे अँड वैभव भोईर यांनी स्पष्ट केले.
कपिल पाटील फाऊंडेशन सह शहरातील वेगवगेळ्या भागात लाखो रुपयांच्या बक्षिसांच्या दहीहंडींचे आयोजन करण्यात आले आहे. धर्मवीर प्रतिष्ठानच्या वतीने सुभाष माने यांच्या नेतृत्वा खाली स्व आनंद दिघे चौकात, माजी आमदार रुपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली भादवड चौकात महेंद्र समाज कल्याणकारी संस्थेच्या वतीने, तर राजनोली नाका येथे शिवसेना उबाठा पक्षाचे तालुका प्रमुख करसन ठाकरे यांच्या माऊली ग्रुपच्या वतीने, भंडारी चौक नारपोली येथे नगरसेवक यशवंत टावरे यांच्या नेतृत्वाखाली शिवशक्ती मित्र मंडळाच्या वतीने तर अंजुर फाटा येथे मनसे प्रदेश उपाध्यक्ष डी के म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली राज मित्रमंडळाच्या वतीने तर दयानंद चोरघे यांच्या डी वाय फाउंडेशनच्या वतीने बापगाव येथे लाखो रुपयांच्या बक्षीस असलेल्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.



